आगामी निवडणुकीत भाजपचा कडेलोट; सुभाष देसाई यांचा इशारा

| उरण | वार्ताहर |

भारतीय जनता पक्षाने आता कितीही गमजा मारल्यातरी येत्या 2024 च्या निवडणुकीत त्यांचा कडेलोट अटळ असल्याचे प्रतिपादन कोंकण विभाग संपर्क नेते सुभाष देसाई यांनी उरण येथील शिवगर्जना मेळाव्यात केले.

जेएनपीटी मल्टिपर्पज हॉल येथे शिवगर्जना मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला बबन पाटील, राजोल पाटील, माजी आ. मनोहर भोईर, दिनेश पाटील, महिला सुवर्णा जोशी, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, रघुनाथ पाटील, महादेव घरत, जे.पी. म्हात्रे, योगेश तांडेल, गणेश शिंदे, अवचित राऊत, दीपक भोईर, विद्या म्हात्रे, सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, ज्योती म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, मेघा दमडे, दीपक ठाकूर, मधुकर ठाकूर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी देसाई यांनी सांगितले कि, कितीही संघर्ष करावा लागला तरीही शिवसैनिक मागे हटणार नाही. कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला त्यांची जागा कळली आहे. आता कधीही निवडणूक लागल्या तरी महाविकास आघाडी व या महागाईने त्रस्त झालेली जनता भाजप व शिंदे गटाला कायमचे घरी बसवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

निवडणुका कधीही लागोत आपला विजय निश्‍चित आहे व उद्धव ठाकरेंना आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे आहे. तसेच शिवसेनेचे गेलेले चिन्ह, नाव परत मिळवून देण्यासाठी व शिवसेनेला पूर्वी सारखे वैभव मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढतच रहा, असे आवाहनही केले. तसेच या गद्दारांच्या साथीने भाजपाने अनेक उद्योगधंदे गुजरातला नेण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बबन पाटील, मनोहर भोईर, नरेश रहालकर, दिनेश पाटील, संतोष ठाकूर यांनी मनोहरशेठ भोईर यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.

Exit mobile version