नवाबांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा आक्रमक मोर्चा; मोर्च्यादरम्यान फडणवीस पोलिसांच्या ताब्यात

। मुंबई । वृत्तसंस्था ।
नवाब मलिकांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज आझाद मैदानावरून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांचे नेतृत्व केले. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसह मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आझाद मैदानवर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, हा संघर्ष देशद्रोह्यांच्याविरोधात आहे. पाकिस्तानी लोकांसोबत मिळून काम करत असलेल्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. मलिकांनी बॉम्बस्फोटांच्या आरोपीकडून जमीन विकत घेतली. पण, त्यांचा राजीनामा अजून घेतला नाही. ही घटना राज्यासाठी लाजीरवाणी आहे. सरदार शाहवली खान याने याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचं प्रशिक्षण घेतलं. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला. तो आजही तुरुंगात आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचा फ्रंट मॅन हा सलीम पटेल या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं. एका बाईची जमीन हडपली. त्यांनी ही जमीन सॉलिडस इंफ्रास्ट्रक्चरला विकली. ही कंपनी नवाब मलिकांची आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी जे तुरुंगात आहेत त्यांच्याकडून तुम्ही कवडीमोल भावात विकत घेतली. तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.मी,

Exit mobile version