ब्लॅक इग्वांना प्राण्याला जीवदान

| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या ग्लोबीकॉन गोदामात यूएसएमधून आयात होऊन आलेल्या एका कंटेनर मध्ये ब्लॅक इग्वांना या प्राण्याला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षित पकडून जीवदान देऊन वनविभागाच्या मदतीने त्याला उपचारासाठी आणि निरीक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

22 डिसेंबर रोजी कोप्रोली येथील ग्लोबीकॉन या गोदमातून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या अध्यक्ष विवेक केणी यांना कंटेनरमध्ये ब्लॅक इग्वांना असल्याचा फोन येताच त्यांनी सहकारी शिवप्रसाद भेंडे यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. ब्लॅक इग्वांनाला कंटेनरमधून शिताफीने पकडून त्वरित वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या मार्फत वनपरीक्षेत्र उरण विभाग यांच्याकडे सुरक्षित पोहोच केले. वनविभागाने त्याला काही उपचार आणि निरीक्षणासाठी पुण्याच्या रिसर्च सेंटरकडे पाठविले आहे.

Exit mobile version