| उरण । वार्ताहर ।
चिरनेर गावचे रहिवासी असलेल्या उदय मोकल यांच्या शेतघराच्या बाजूला रविवारी (7) रात्रीच्या सुमारास एक साडेनऊ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा अजगर भक्षाच्या शोधार्थ आला होता. कोबड्या आरडाओरडा का करतात हे पाहाण्यासाठी घराच्या ओसरीत आल्यावर मोकल यांना समोरच साडेनऊ फुटी लांबीच्या अजगर नजरेस पडला. रात्रीच्या वेळेस भल्यामोठ्या अजगराला पाहून भांबावलेल्या मोकल यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे राजेश पाटील यांनी साडेनऊ फुटी लांबीच्या अजगराला शिताफीने पकडले आणि त्याला नैसर्गिक आवासात सोडून दिले.