| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरातून जासई येथे कामासाठी गेलेला व्यक्ती अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हरिश्चंद्र थावरु जाधव वय 35 वर्षे, रंग सावळा, अंगाने मध्यम, उंची 5 फूट, केस काळे छोटे, धाडी व मिशी बारीक, अंगात नेसून पांढर्या रंगाचा शर्ट त्यावर लाल रेषा असलेला, राखाडी रंगाची हाफ पंत, पायात चप्पल सोबत मोबाईल नाही. असे या व्यक्तीचे नाव व वर्णन आहे. जाधव हे पनवेल परिसरातील सोसायटी नाका येथून मिळेल त्याठिकाणी मजुरीचे काम करण्यासाठी जात असे, यावेळी येथूनच उरण येथील जासई याठिकाणी मजुरीचे काम करण्यासाठी गेले असता अद्यापपर्यंत घरी परातलेच नसल्याने त्यांची पत्नी विजयाबाई जाधव यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत हरविल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस तक्रार दाखल करून त्या महिलेचा शोध सुरु केला आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यु.बी.पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.