माणगावात काळ्या भाताची शेती

निलेश थोरे यांचा पुढाकार

| माणगाव | प्रतिनिधी |

अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगराई, शेतमालाला येणारा पडा भाव व खतांचे वाढते दर या सगळ्यावर मात करण्यासाठी माणगाव तालुक्यातील युवा शेतकरी निलेश थोरे यांनी चेरवली ग्रामस्थ व म्हसळा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून काळ्या भाताची लागवड केली आहे. तब्बल पाच एकरांवर ही लागवड केली असून, काळ्या तांदळाचे चखहाऊ जातीचे बियाणे हे मणिपूर राज्यातून आणले आहे.

काळा तांदूळ हा संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवला जात असून, अतिशय चविष्ट व आरोग्यवर्धक असतो. काळ्या तांदळाच्या भाताचे व खीर बनवून सेवन केल्याने कर्करोग टाळण्याची क्षमता तयार होते. काळा तांदूळ आरोग्यासाठी चांगला मानला जातो. काळ्या तांदळात दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, ज्यात कर्करोगापासून संरक्षण करण्याची क्षमता असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळा तांदूळ चांगला मानला जातो. काळ्या तांदळात अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि आयर्न असते, जे मधुमेह नियंत्रित करते. काळ्या तांदळात असलेले अँथोसायनिन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते. वजन कमी करण्यासाठी उपयुक्तकाळा तांदूळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. काळ्या तांदळात प्रथिने आणि फायबर भरपूर असते, जे वजन नियंत्रित ठेवते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आहारावर असाल, तर तुम्ही त्याचे सेवन करू शकता. काळा तांदूळ डोळ्यांसाठीही चांगला मानला जातो. यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आढळतात जे डोळे निरोगी ठेवतात. काळा भात नियमित खाल्ल्याने मोतीबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या गोष्टींचा धोका कमी होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीरकाळे तांदूळ फायदेशीर आहे.

अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे आपल्या त्वचा, मेंदू आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. या सर्व आरोग्यवर्धक गुणांमुळे व आपल्या विशिष्ट चवीमुळे बाजारपेठेत काळ्या तांदळाला 250 ते 400 रु. प्रती किलो दराने मागणी असते. म्हसळा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेयरमन निलेश मांदाडकर व इतर संचालकांच्या सहाय्याने भविष्यात काळ्या भाताचे बियाणे व खत माणगाव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन अशा जवळपासच्या तालुक्यामध्ये विक्रीकरिता उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सदरचा प्रयोग चेरवली गावी करताना खरवली ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील सकपाळ, प्रगतशील शेतकरी सुधाकर खडतर, संजय खडतर, दत्ता खडतर, काशीराम खडतर, रमेश खडतर, धनाजी खडतर, नथुराम खडतर, पांडुरंग खडतर तुकाराम खडतर अशा अनेक शेतकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल आभार मानले आहेत.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये जवळपास पाच ते सात पटीने वाढ होईल व प्रत्येक लाखाला किमान तीन लाख रुपये इतका नफा शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे भातशेती ही न परवडणारी राहणार नाही व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भातशेती हा मुख्य व्यवसाय म्हणून निवडता येईल.

निलेश थोरे, युवा शेतकरी
Exit mobile version