महिलेचे अश्‍लिल फोटो काढून ब्लॅकमेलिंग; आरोपीस अटक

| माणगाव | वार्ताहर |
महिलेला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन काढलेले तिचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन महिलेला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी  अनंत बासू मातारी या आरोपीस  माणगाव पोलिसांनी अटक केली आहे.सदरची घटना सन 2015 ते दि.21 जुलै 2022 दरम्यान पॉस्को कंपनी विळे-भागाड,निजामपूर व फिर्यादी महिला यांच्या मोबाईलवर ता.माणगाव येथे घडली.

अनंत बासू मातारी (वय-37) रा.पॉस्को कंपनी गेस्ट हाऊस विळे-भागाड ता.माणगाव मूळ रा.राज्य आसाम याने फिर्यादी पीडित महिलेस कॉफीमध्ये कोणतेतरी गुंगीकारक औषध देऊन तिचे अश्‍लिल फोटो काढून ते आरोपी याने त्याच्या व्हाट्स अप क्रमांकावरून फिर्यादी महिलेच्या व्हाट्स क्रमांकावर पाठवून ते फोटो सोशल मीडियावर व फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांना पाठवेन अशी धमकी देऊन फिर्यादी महिलेकडून एकूण 6 लाख 70 हजार रुपये काढून घेतले.तसेच फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवण्याचे वारंवार मागणी करून फिर्यादी महिलेला मानसिक त्रास दिला.या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात  येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास  पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version