लाखोंचा ऐवज चोरीला
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड येथे घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरटा 2 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून फरार झाला आहे. ही घटना दि.24 ते दि.25 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. या घटनेची तक्रार राजकुमार शंभरकर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विळे-भागाड येथील राजकुमार भाऊराव शंभरकर यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे 5 तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 22 हजार 500 रुपये किमतीचे 5 ग्राम वजनाचे 2 सोन्याचे कानातील टॉप्स व रोख रक्कम 2 हजार रुपये असा एकूण 2 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. तसेच, इतर घरांचे देखील कडी कोयंडा तोडून घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.