। पनवेल । वार्ताहर ।
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा मतदारसंघातील नेरे आणि वावंजे जिल्हा परिषद गट हद्दीतील गावांना भेटी देण्यावर जोर देण्यात आला. प्रत्येक गावात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गाव बैठकांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता ग्रामीण विभागातून संजोग वाघेरे पाटील आघाडीवर राहतील असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता गाव बैठकांना प्रारंभ करण्यात आला. आदई, नेवाळी, कोळवाडी, पाले बुद्रुक, वलप, कानपोली, खेरणे, नितळस, वावंजे, चिंध्रण, शिरवली, कुत्तरपाडा, महाळूंगे, मोर्बे, खानाव, वाकडी, तळोजा पांचनंद, केवाळे, हरीग्राम या गावांमध्ये प्रचार बैठका संपन्न झाल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विद्यमान खासदारांच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर जोरदार शाब्दिक प्रहार केले. संजोग वाघेरे यांच्या रूपाने प्रतिनिधी दिल्लीला पाठवा असे आवाहन सर्वच वक्त्यांनी मतदारांना केले.