पाणी अडवा पाणी जिरवा योजना वार्‍यावर

बंधार्‍यामुळे पावसाचे हजारो लिटर पाणी जिरविण्यात मदत

| म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा तालुक्यात दरवर्षी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत तालुक्यात शेकडो बंधारे बांधले जातात. बंधारे बांधण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायती कार्यालय, संस्था शाळा, कॉलेज अशा विविध कार्यालय शाळा एकत्र येऊन नदीत मातीचे वनराई बंधारे बाधण्यासाठी नियोजन करतात. या बंधार्‍यामुळे पावसाचे वाया जाणारे हजारो लिटर पाणी भूगर्भात जिरविण्यात मदत होते. या बंधार्‍यात साठलेले पाणी वन्य जीवांना व गुरांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे वनराई बंधारे उपयुक्त ठरतात.

2017 मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील 39 ग्रामपंचायती मध्ये एकूण 107 वनराई बंधण्याचे कार्य म्हसळा पंचायत समिती मार्फत 83 गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामपंचायतीच्या साहाय्याने गावानजीक जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून 25 मिटरपेक्षा ज्यास्त लांबीचे वनराई बंधारे बांधण्यात आले. तालुक्यात निगडी, कांदळवाडा, वरवठणे, रेवली, खरसई, वारळ, काळसुरी, तुरूंबाडी, रोहीणी, मेंदडी, पाभरे, भे. कोंड, मांदाटने, खामगाव, कुडगांव, कणघर, लेप, खारगांव खु, कोळवट, ठाकरोली, तोंडसुरे, नेवरूळ, आडी म. खाडी, कोळे, संदेरी, आंबेत, लिपणी वावे, फळसप, घुम,जांभूळ, साळविंडे, गोडघर, चिखलप, खारगांव बु, पांगळोली, तोराडी, घोणसे, देवघर या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांने उत्तम काम केल्याचे विकास अधिकारी प्रभे यांनी कौतुक केले होते. त्यांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या श्रमदानातून व सरपंच सदस्य यांच्या नियोजनातून दर्जेदार काम केले होते.

सर्व ग्रामपंचायतीपेक्षा ग्रुप ग्रामपंचायत केलटे ग्रामपंचायतीने तब्बल 25 मिटर पेक्षा लांबीचे सहा वनराई बांधण्याचे काम केलटे ग्रामस्थ, महिला मंडळ, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांनी केले. पाणी साठविण्यासाठी कमी वेळेत बंधारे बांधल्याने ग्रामस्थांचा व शासनाचा आर्थिक भार यामुळे कमी झाला होता. तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला एक आदर्श संदेश दिला होता. परंतु यावर्षी वनराई बंधारांचे काय होणार, हे आजही स्पष्ट चित्र दिसत नाही. तालुका हा पाण्यासाठी वरदान ठरलेला तालुका आहे. परंतु तालुक्याची रचना हि उतार भागाची असल्याने पडलेल्या पावसाच पाणी कुठेही न थांबता ते मार्गस्त होते. त्याकरिता तालुक्यात वनराई बंधारे बांधणे हि काळाची गरज आहे. परंतु त्या गरजेकडे म्हसळा प्रशासनाला नेमका विसर का पडला, हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

बंधारा बांधण्याचे फायदे
गाभा भिंतीसाठी माती लागत नाही, सुपीक मातीची दरवर्षी होणारी धूप मोठ्या प्रमाणात कमी होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते, प्लॅस्टिक अस्तरणामुळे नाल्यातून पाझरणारे पाणी कमी होते आणि पाणी जास्त वेळ टिकते, लोक सहभागातून जलसंधारण साधता येते, कमी खर्चामध्ये जास्त वेळ पाणी अडविता येते, अडविलेले पाणी पूरक सिंचनासाठी तसेच जनावरासाठी वापरता येते, विहीर पुनर्भरणासाठी मदत होते, बंधारा बांधण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता नाही,अशा प्रकारच्या बंधार्‍यामुळे उन्हाळ्यात जाणवणार्‍या पाण्याचा प्रश्‍न सोडविता येते.

समिती म्हसळा कृषी विभागाकडून संबधित ग्रामपंचायतीना वनराई बंधारे बांधण्यासाठी पत्रव्यवहार केले आहेत. ज्या ठिकाणी विहिरी, जनावरे पाणी पिण्याचे ठिकाण, नदी नाल्याचे पाणी थांबण्याचे ठिकाण पाहून त्याठिकाणी लोक सहभागातून बंधारे बांधण्यात यावे, अशा प्रकारचे लेखी पत्र दिले आहे.

भाऊसाहेब पोळ, गटविकास अधिकार म्हसळा
Exit mobile version