रक्तपेढ्यांची माहिती अद्ययावत आवश्यक

आ.जयंत पाटील यांची मागणी
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील रक्त संकलित करणार्‍या रक्तपेढ्यांची माहिती अद्ययावत ठेवली जावी,अशी मागणी आम.जयंत पाटील यांनी सभागृहात केली. गुरुवारी सभागृहात या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर आम.जयंत पाटील यांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे रक्त संकलनाची माहिती अद्ययावत न ठेवणार्‍या 234 रक्तपेढ्यांवर कारवाई केली आहे.तसेच जी रक्तदान शिबिरे घेतली जातात यासाठी शासनाने काही नियमावली केली आहे,अशी विचारणा त्यांनी सभागृहात केली.
आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती अद्ययावत न ठेवलेल्या 234 रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून 61 लाख 23 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. जे रक्तदान शिबिरे आयोजित करतात त्यांच्यासाठी सरकारची नियमावली असून,एकावेळी रक्तासाठी 35 दिवसांचे लाईफ आहे.महाराष्ट्रात रक्त खराब होण्याचे प्रमाण कमी असून,आपत्तीच्या काळात रक्त उपयोगी पडावे म्हणून 10 दिवसापर्यंतचे रक्त साठवून ठेवतो.रक्तदान शिबिरे ही स्ॅटगड पद्धतीने घेण्याची सुचना देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

Exit mobile version