। खोपोली । प्रतिनिधी ।
एल.एम.साबळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने यशवंत साबळे मित्र परिवाराने मंगळवारी (दि.26) महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे रक्तदान आणि आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. खोपोलीतील विविध भागातील नागरिक, अबालवृध्दांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल-नवीन पनवेल, सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक, टाटा मेमोरियल सेंटर-मुंबई आणि प्रिवेंटिव्ह ओनकॉलॉजी सर्व्हिसेस खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया कर्करोग पूर्व तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 58 जणांनी रक्तदान केले. या सर्वांना टिशर्टचे वाटप करण्यात आले. 47 कँन्सर तपासणी, 151 जणांची नेत्र तपासणी त्यामधील 14 रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. 35 रूग्णांनी दंत तपासणी केली आहे.
याप्रसंगी साबळे यांच्या पत्नी काशिबाई साबळे, मुलगा यशवंत साबळे, स्नुषा रेणूका साबळे, नातू विक्रांत साबळे यांनी अभिवादन केल्यानंतर शिबीराला प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी दत्ताजीराव मसुरकर, शेकापक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, शिवानी जंगम, शेकाप शहर चिटणीस अविनाश तावडे, मंगेश दळवी, मनेष यादव, अबू जळगावकर, चंद्राप्पा अनिवार, संदीप पाटील, चंद्रकांत केदारी, विनायक तेलवणे आदी उपस्थित होते.