आवरे येथे रक्तदान शिबीर

| उरण | प्रतिनिधी |

स्व. दिलीप मधुकर ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने समर्पण ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने शनिवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भोलानाथ मंदिर आवरे येथे कै. मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे, मर्दनगड संवर्धन समिती, शिवसेना युवा सेना आवरे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी कौशिक ठाकूर 9821119617, सुनील वर्तक 9820130088, गणेश ठाकूर 9594951816, महेश गावंड 9870561379 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version