चौकीचापाडा येथे रक्तदान शिबीर

। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील श्री हनुमान मंदिरामध्ये शनीवार दि 18 जून रोजी जिल्हा रुग्णालय अलिबाग रक्तपेढीच्या माध्यमातून बी नवजवान सेवा मंडळ चौकीचा पाडाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहाबाज ग्राम पंचायतीचे सरपंच धनंजय म्हात्रे याच्या हस्ते झाले. यावेळी अलिबागचे रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, डा.ॅ श्रेयश पाटील, डॉ सहारा शेख,डॉ पुनम भिडवे, पूनम पाटील,आकाश सावंत, महेश घाडगे,भुपेंद्र पाटील, घनश्याम भगत,देवेंद्र म्हात्रे,सुधीर म्हात्रे, अविनाश म्हात्रे, चिंतामण म्हात्रे, माजी सदस्य जनार्धन जुईकर, वसंत पाटील, राजेंद्र तरे, रमेश जुईकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 26 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले.

Exit mobile version