खालापूर टोलनाका येथे रक्तदान शिबीर

| खोपोली | प्रतिनिधी |

रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमानिमित्ताने मुंबई-पुणे दृतगती महामार्गांवर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाळीसहून अधिक जणांनी आपले रक्तदान करून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे सहकार्य केले आहे. मुंबई-पुणे दृतगती महामार्गांवर अनेक अपघात घडत असतात त्यात जखमी झलेल्या रुग्णांना तसेच अनेक अन्य आजरातील रुग्णांना रक्ताची खूप आवश्यकता भासत असते, रुग्णांना आपल्याकडून छोटीशी मदत होईल आणि रुग्णांचे प्राण वाचतील या दृष्टीकोनातून रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमानिमित्ताने मुंबई-पुणे दृतगती महामार्गांवर खालापूर टोलनाका येथे महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट, लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपघातग्रस्थ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, आयआरबी, सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले, अल्पेश शहा, निजामुउद्दीन जळगावकर यांसह समर्पण ब्लड बँकचे सर्व अधिकारी आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version