। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमीत्त शुक्रवारी (दि.29) शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी आणि बँक, खोपोली शाखा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात शिक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. तसेच, विद्यार्थ्यांबरोबरच पालीतील काही नागरीक व माजी विद्यार्थ्यांनी देखील रक्तदानात भाग घेतला होता. या रक्तदान शिबिरात एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी बँकेकडून प्रत्येक रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र लिमये, कार्यवाह गीता पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर, डॉ. सुधाकर लहुपचांग, हेमंत खेडेकर, कुलकर्णी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.