तटकरे तंत्रनिकेतनात रक्तदान शिबीर

। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्रीमती गीता तटकरे तंत्रनिकेतन, कोलाड गोवे येथे अभियंता दिवसानिमित्ताने गुरुवारी (दि.15) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबीराप्रसंगी जिल्हा रुग्णालय शासकीय रक्तपेढी अलिबागचे डॉ. दीपक गोसावी व त्यांचे सर्व सहकारी, प्रा. विपुल मसाल, अजित तेलंगे, सर्व शाखेचे विभाग प्रमुख,व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version