। दिघी । वार्ताहर ।
वडवली येथील सहकार्य सामाजिक शिक्षण संस्था व मुंबईस्थित वडवली आगरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी वडवली व पंचक्रोशीतील युवक व युवतींनी रक्तदान करून राष्ट्रकार्यात योगदान दिले. सदर शिबिराचे उद्घाटन वडवली आगरी समाज अध्यक्ष संतोष नाक्ती यांच्या हस्ते व वडवली आगरी समाज मुंबई अध्यक्ष सुरेश नाक्ती यांच्या अध्यक्षतेखाली वडवली ग्रामपंचायत सरपंच प्रियंका नाक्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी वडवली ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश धुमाळ, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य दिपक कांबळे, संत निरंकारी मंडळ वडवलीचे मुखी गणेश नाक्ती, वडवली आगरी समाज उपाध्यक्ष किशोर बिराडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आयोजक संघटना अध्यक्ष धनंजय चौलकर व सदस्य तसेच संस्था अध्यक्ष निलेश नाक्ती व सदस्य यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. अलिबाग येथील जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शरद गोसावी व टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.