धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर

। उरण । वार्ताहर ।
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जेएनपीटी वसाहत मधील मल्टिपर्पज सभागृहामध्ये दि 12 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 900 हुन अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले.या शिबिरामध्ये तीन रक्तपेढ्यानी आपली टीम तैनात केली.जे.जे महानगर ब्लड बँक,जिल्हा रुग्णालयात अलिबाग रक्त केंद्र, डी वाय पाटील रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले. आज सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे, अनेकांनी रक्त न मिळाल्याने आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे भासत असलेली रक्ताची गरज दूर करण्यासाठी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत रक्तदान शिबीर संपन्न झाले.या शिबिराचे उदघाटन जेएनपीटीचे मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, विकास भोईर, दीपक ठाकूर,मनीषा जाधव,डॉ. राज हिंगोराणी,प्रसाद कुलकर्णी, डॉ. श्रेयस पाटील, श्री सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version