50 बाटल्या रक्तसंकलन
I अलिबाग I प्रतिनिधी I
लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने अग्रसेन भवन, पोयनाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 50 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.
यापूर्वी पोयनाड लायन्स क्लबने अनेक वेळा रक्तदान शिबिरे आयोजित करुन, तसेच गरीब-वंचित, आदिवासींना विविध प्रकारची मदत करुन आपले सामाजिक भान दाखविले आहे.
यावेळी लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष मनोहर चवरकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रगती सिनकर, खजिनदार विकास पाटील, माजी अध्यक्ष मनीष अग्रवाल, कौस्तुभ जोशी, महेंद्र पाटील, सतीश पाटील, संतोष पाटील, दिलीप गाटे, ओमकार जोशी, गौरव सिनकर, ममता अग्रवाल, सुनीता अग्रवाल, ज्योती पाटील, कुशल अग्रवाल आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात जिल्हा रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, आकाश सावंत, महेश घाडगे, रवींद्र कदम आदींनी रक्तसंकलन केले. या शिबिरासाठी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. तसेच क्लबच्या वतीने रक्तदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.