आवास येथे रक्तदान शिबीर संपन्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लायन्स क्लब मांडवा, दिलखुश क्रीडामंडळ आवास, ग्रुप ग्रामपंचायत आवास, मुंबई हेल्थ केअर सेंटर, तेरणा हॉस्पिटल व लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.5) आवास येथील रा.जि.प. प्राथमिक शाळेत लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याअंतर्गत 227 जणांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या, तसेच 35 जणांनी रक्तदान केले.

यावेळी द्वितीय उपप्रांतपाल प्रवीण सरनाईक, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, अनिल म्हात्रे, नयन कवळे, रिजन चेअरपर्सन विजय वनगे, झोन चेअरपर्सन प्रीतम गांधी, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष ऋग्वेद ठाकूर, सचिव निकिता पाटील, खजिनदार प्रदीप पाटील, सुबोध राऊत, विद्या अधिकारी, अमिश शिरगावकर, अमरेश शिरगावकर, स्मितल शिरगावकर, साक्षी शिरगावकर, चंद्रकांत मल्हार, मोहन पाटील, सुनीता पुरो, सुधीर पुरो, सुमित पाटील, जितेश्री ठाकूर, लायन्स क्लब अलिबागच्या अध्यक्ष अ‍ॅड. गौरी म्हात्रे, सचिव अंकिता म्हात्रे, लायन्स क्लब श्रीबाग, सेंटिनिअलचे अध्यक्ष अ‍ॅड.के.डी. पाटील, ए.एस.एन. मूर्ती, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी आदी लायन्स उपस्थित होते.

Exit mobile version