धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे चिपळूणमध्ये रक्तदान शिबीर

। चिपळूण । वार्ताहर ।
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ता. अलिबाग जि . रायगड यांचेवतीने जेष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दीनिमित्त व जेष्ठ निरूपणकार पदमश्री डॉ . आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन सदस्यांचेमार्फत चिपळूण येथे दिनांक 18 मे रोजी परांजपे मोतीवाले हायस्कुल चिपळूण येथे सकाळी 8:30 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले आहे.सदर रक्तदान शिबीराकरीता गुहागर चिपळूण खेड दापोली पोलादपूर तालुक्यातुन अनेक सदस्य उपस्थित रहाणार असून सदर रक्तदान शिबीर पुर्णतः निष्कामतेने केले जाणार आहे . तरी या दिमाखदार अशा डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचेवतीने होणारे भव्य रक्तदान शिबीरास सर्वांनीउपस्थित रहावे असे अवाहन डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने केले जात आहे.

Exit mobile version