रक्तदान शिबीर उत्साहात

| अलिबाग | वार्ताहर |
निकदवरी लेन गणेशोत्सव मंडळ, सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे रविवार, दि. 11 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना सारस्वत ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी समाजाचे सचिव राजन देसाई, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर, प्रवीण मंत्री, ईशकृपा हॉटेलचे मालक इराणी, सहसचिव निलेश रांगणेकर, श्रीकांत तेंडुलकर यांनी मेहनत घेतली. यावेळी शिबिरार्थींना छत्री, सॅनिटायझर आणि बिस्कटांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version