। अलिबाग । वार्ताहर ।
अनिरुध्द राणे मित्रमंडळ आणि शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्याने संचालक मंडळ हायस्कूल, नागांव, अलिबाग येथे रुपेश रविंद्र नाईक यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 61 दात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांनी केले. विद्यमामन सरपंच निखिल मयेकर यांनी रक्तदान शिबिरात सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हर्षदा मयेकर, मंजुषा राणे, श्रीकांत आठवले, सुरेंद्र नागलेकर, रुपेश नाईक यांचे वडील रविंद्र नाईक, मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक महिलांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. हिमोग्लोबिन ची कमतरता असलेल्या काही दात्यांना रक्तदान करता आले नाही व संबंधित डॉक्टरांनी याबाबत त्यांना मार्गदर्शनसुद्धा केले. सदर शिबिराकरीता शासकीय रक्तपेढीचे मेडिकल ऑफीसर डॉ. श्रीयेश पाटील , हेमकांत सोनार, मंगेश पिंगळे, चेतन राठोङ, विरेंद्र स्वामी, गणेश सुतार व अन्य सहकारी यांच्या वैद्यकीय सहाय्याने तसेच अनिरुध्द राणे मित्रमंडळ तर्फे शुभम नाईक, शुभम नगलेकर, प्रतिकेश वाळंज, चैतन्य लोहार, सुदेश चोघले आदी सदस्यनी परिश्रम घेऊन रक्तदान शिबीर यशस्वी केले.