रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त धर्माधिकारी प्रतिष्ठानवतीने सुधागड तालुक्यातील पाली श्री बल्लाळेश्वर देवस्थान भक्तनिवास क्रमांक 1 येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रुग्णाला वाचविण्यासाठी रक्ताची अंत्यत गरज असते रक्तकुठल्याही प्रयोग शाळेत तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे असते.त्यानुसार सुधागड तालुक्यातील शेकडो रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून श्रेष्ठ दान केले.यावेळी के.एम.रुग्णालय रक्तपेढी मुंबई, तसेच समाज विकास अधिकारी हेमंत सकट, डॉ. निकिता पंत, डॉ.आयुष डॉ.अवणी, अमोल मोराले, गंगाधर मुंढे, अमित चाळके, प्रांजळ पाटील, समीर मोरे, महेंद्र सावंत तसेच शेकडो श्री सदस्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
के. एम.हॉस्पिटलमध्ये अडीच हजार बेडची व्यवस्था आहे. तिथे अडीच हजार बेडमध्ये दिवसाला दीडशे ते दोनशे रुग्णांना रक्त पुरवावे लागते. तेथे एकच ब्लड बँक आहे आणि तेही रक्त मोफत देण्यात येते. डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे योगदान मोठे आहे आता पर्यंत अनेक रक्तदान शिबिर राबवून त्यांनी गरीब गरजूंना रक्त पुरवठा केला आहे.
– हेमंत सकट समाज विकास अधिकारी