| नवीन पनवेल । वार्ताहर ।
नेरे विभागात आकुर्ली ते धोदाणी, हरीग्राम ते मोरबे, वाकडी ते दुंदरे, शिवणसई, आंबे या ग्रामीण भागात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडीत होत आहे. खंडीत विजपुरवठयामुळे नागरीकांत मोठा संताप व्यक्त होत आहे. छोटया मोठया व्यवसायांवर याचा मोठा परिणाम होत आहे. तसेच सततच्या खंडीत विजपुरवठयामुळे अनेक घरातील विदयुत उपकरणे खराब होत आहेत. त्याला जबाबदार कोण ? त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल मनसेने विचारला आहे. विजेचा सुरू असलेला लपंडाव सुरळीत करण्याची मागणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिंगारी याना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कुणाल फडके, विश्वास पाटील,विद्याधर चोरघे, दिनेश मांडवकर उपस्थित होते.