स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त पेझारीत 23 जानेवारीला रक्तदान शिबीर

। अलिबाग । वार्ताहर ।
पेझारी येथील श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानन स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही पेझारी येथील श्रीदत्त मंदिर सभागृहात रविवारी (23 जानेवारी ) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हा प्रमुख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी दिली आहे.


हे रक्तदान शिबीर श्रीदत्त मंदिर सभागृह येथे सकाळी 10 ते 2 या वेळात होणार आहे . यंदाचे शिबिराचे हे 24 वे वर्ष आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते होणार असून या शिबिराच्या उद्धाटनप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
इच्छुक रक्तदात्यांनी दिगंबर राणे 9422371098, दिनानाथ कडू 9422695039, निकेश पाटील 9834766156, मुकुंद म्हात्रे 9226370771, नरेश म्हात्रे 9309507342, सुमित राणे 9028414613 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version