माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

112 जणांनी केले रक्तदान

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत नाईक मित्र मंडळ अलिबाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या सहकार्याने अलिबाग कच्छि भवन श्रीबाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 112 रक्तदात्यानी रक्तदान केले.

शेकाप महिला आघाडी प्रमुख माजी नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी प्रशांत नाईक मित्र मंडळाचे आयोजक डॉ. दीपक गोसावी, रवि थोरात, संजय कांबळे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, अशोक प्रधान, कपिल अनुभवणे, प्रवीण जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहकार्य लाभले. रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीमध्ये गत काही दिवसांपासून रक्तााचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांनी केले नुकतेच केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये रक्ताचा तुटवडा कमी होण्यास मदत झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version