माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार
। पनवेल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवासाचे औचित्याने पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तर यावेळी शेकाप नेते, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तेरणा हॉस्पिटलच्या रक्तसंकलन विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने केले. रक्तसंकलन विभागाच्या ब्लड रिस्टोरेशन ऑफिसर डॉ. सलोनी दिघे आणि त्यांच्या टीमने रक्तदात्यांची तपासणी करून रक्त संकलन केले.

या रक्तदान शिबीर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी सभापती मोहन कडू, माजी उपसभापती संतोष कृष्णा पाटील, बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, संचालक तथा आदई ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे, प्रकाश पाटील, सुरेश भोईर, सचिव भरत पाटील, विश्‍वास म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस नारायण घरत, विद्यमान तालुका चिटणीस राजेश केणी, तेरणा ब्लड बँकेचे केसरीनाथ भगत, नितीन पाटील, मेडिकल सोशल वर्कर दत्ता राठोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल परिसरातील व्यापारी, तोलारी, आडते यांनी सदरच्या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.

Exit mobile version