महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

| हमरापूर | प्रतिनिधी |

पेण शहरात भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री आदेश्वर भक्ती मंडळ पेण तर्फे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पेण जैन समाजाचे अध्यक्ष कीर्ती बाफना, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेवक प्रवीण पाटील, अशोक जैन, नगरसेवक मितेश शहा, डॉ. सुरेश जैन, डॉ. मंजुळा जैन, डॉक्टर दिलीप जैन, डॉ. आशा जैन, डॉ. धीरज जैन, सुभाष जैन, नरेश जैन, श्री आदेश्वर भक्तिमंडळाचे अध्यक्ष दिवेश पोरवाल, उपाध्यक्ष प्रकाश खांटेड, खजिनदार हितेश पोरवाल यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात जवळपास 50 जणांनी रक्तदान केले. तर रोटरी ब्लड सेंटर पनवेलच्या टीमने रक्तसंकलनाचे काम केले.

Exit mobile version