| रायगड | प्रतिनिधी |
भगवान महावीर जयंतीनिमित्त कच्छीभवन ट्रस्ट अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कच्छ युवक संघ, ऐकरवाला रक्तदान अभियानाचे आयोजन मंगळवारी (दि.31) अलिबागेतील कच्छी जैन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 161 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या महारक्तदान शिबिरामध्ये अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चोप्रा, अलिबागचे निरीक्षक किशोर साळे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, गिरिश म्हात्रे, महेश कवळे, रणजित जैन, संतोष पाटील, दिपक पाटील, विकास घरत, नयन कावळे, महेंद्र पाटील, डॉ. राजाराम हुलवान, कच्छी भवन ट्रस्टचे धिरेंद्र काराणे, केतन शहा, धर्मेश देढिया, अमित शहानंद, भावेश पटेल, जतीन काराणे, पारस मोता, सुनील तांबडकर, साई मोटर ट्रेनिंग स्कूलचे मेहूल पाटील, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे समाजसेवा अधीक्षक संग्राम माकर, वैद्यकीय समन्वयक चिन्मय तळेकर, सदस्य विठ्ठल शिंदे, डॉ. दीपक गोसावी व हेमकांत सोनार आदी उपस्थित होते. तसेच, या रक्तदान शिबिरामध्ये प्रशांत नाईक मित्रमंडळ, लायन्स क्लब अलिबाग डायमंड, अलिबाग रेवस मिनिडोर संघटना, अलिबाग ऑटो रिक्षा संघटना, आगरी समाज संस्था अलिबाग, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान आणि मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अलिबाग या संस्थांनी देखील सहभाग नोंदविला होता.







