शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावातील शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेच्यावतीने के.ई.एम रुग्णालय परळ-मुंबई यांच्या सौजन्याने व विशेष सहकार्याने शिवजयंती निमित्त शुक्रवारी (दि.13) महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर माणगावातील सिद्धीनगर येथील सरलादेवी मंगल कार्यालय सभागृहात पार पडले. या महारक्तदान शिबिरात 177 रक्तबॅगा संकलित करण्यात आल्या. या उपक्रमाला माणगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष करून विद्यार्थिनी व महिला यांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष तथा विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे व संस्थेच्या सल्लागार विवा कॉलेजच्या चेअरमन विनया ढेपे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे व रक्तदात्यांचे तसेच देणगीदार, हितचिंतक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीम शेख, रक्तदान शिबीर समिती अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे व सर्व सहकारी पदाधिकारी व सभासद यांनी स्वागत करून सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले. या सेवाभावी उपक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय साबळे, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, केईएम रुग्णालयाचे समाज विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावंत, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्षा रिया उभारे, रचना थोरे, माणगाव मेडिकोजचे अध्यक्ष डॉ.परेश उभारे, संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार, विजयशेठ मेथा, अकबर परदेशी, सिराज परदेशी आदींसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन संस्थेला भरभरून शुभेच्छा देत कौतुक केले.

Exit mobile version