| अलिबाग | प्रतिनिधी |
संत निरंकारी मिशनच्या अलिबाग तालुक्यातील भिलजी येथील चॅरीटेबल फाऊंडेशनच्यावतीने रविवारी (दि.30) सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संत निरंकारी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये अलिबाग येथील जिल्हा शासकीय रक्तपेढी मार्फत रक्तसंकलन होणार आहे. संत निरंकारी मंडळाचा रक्तदानाचा हा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योन्मुख करत आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मंडळाचे भिलजी शाखेचे मुखी सुरेश गावंड यांनी केले आहे.
भिलजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
