| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव बंदर येथे दर्यावर्दी मित्र परिवार नवरात्र उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला असून, 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच मंडळाकडून भारतीय डाक विभागाच्या पॉलिसीचेदेखील आयोजन करण्यात आले. त्यात 40 लोकांनी पॉलिसी काढल्या. अनेकांना याचा लाभ पुढे जाऊन घेता येईल, अशा सरकारी सुविधा या पॉलिसीमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दर्यावर्दी मित्र परिवाराकडून अनाथ आश्रमात गरजू लोकांना अन्नधान्य वाटप, तर मुलांना शालेय साहित्य वही, पुस्तक, पेन आणि अन्नधान्य जमवून वाटप करण्यासाठीची योजना केली आहे. लवकरच खोपोली येथील अनाथ आश्रमात त्याचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण नागाव विभागातील दर्यावर्दी मित्र परिवाराने सहकार्य केले. यावेळी सचिन राऊळ, नितीन पाडेकर, रोहित पाटील, संतोष राऊळ, प्रसाद मानकर, रूचिर राऊत, अक्षय राऊत आणि मित्र परिवार उपस्थित होते.