। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील डेरवली गाव परिसरात एक मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर वाढलेले गवत काढण्याचे काम सुरु असताना तेथील उपस्थित कामगारांना हा मानवी सांगाडा आढळून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली असून, त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी सदर ठिकाणी जाऊन मानवी सांगाडा ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.