। खोपोली । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब खोपोली, अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था व सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक यांच्या विद्यमाने डॉ रामहरी धोटे सभागृह – लायन्स सर्व्हिस सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घघाटन अल्टा लॅबोरेटरीजचे डायरेक्टर आदित्य आणि रीचा धोत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी कोरोना काळात सुरू केलेला रक्तदानाचा उपक्रम भविष्यातही अल्टा लॅबोरेटरीजच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने सुरू राहणार असे प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश राठी यांनी केले . तसेच सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे राठी म्हणाले. यावेळी गोदरेज बॉईज कंपनीचे सीएसआर फंडाचे इन्चार्ज तानाजी चव्हाण, पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, सहाय्यक पोलीस निरक्षक हरेष काळसेकर, समर्पण ब्लड बँकचे अभय तन्ना यांनी शिबिर प्रसंगी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. हनीफ कर्जीकर,अमोल कदम, अल्टा लॅबरोटरिजच्या कामगारांसह शहरातील युवक,युवतींनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.