आदर्श पतसंस्थेच्या श्रीबाग शाखेकडून रक्तदान


| अलिबाग | प्रतिनिधी |

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबागच्या श्रीबाग शाखेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले. आदर्श पतसंस्था 8 जून व 7 जानेवारी असे वर्षातून दोन वेळा शाखांच्या वर्धापन दिनानिमित्ताने रक्त शिबिराचे आयोजन करीत असते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबागच्या श्रीबाग शाखेच्या 5 व्या वर्धापदिनानिमित्त 08 जानेवरी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आदर्शतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या रक्तदान शिबिरांमधे संकलित झालेल्या रक्ताचे कार्डस आदर्श पतसंस्थेत ठेवलेले असते. ज्या गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते त्या रुग्णांना आदर्श मधुन कार्डस दिले जातात आणि त्या बदल्यात रुग्णांना रक्तपेढीतून मोफत रक्त उपलब्ध करुन दिले जाते.

Exit mobile version