रक्तदान शिबिरात 46 रक्तदात्यांचे रक्तदान

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मोठे वेणगावमधील राणाप्रताप मित्र मंडळाच्यावतीने आपला एक अकस्मात गेलेला सहकारी स्व. प्रितेश शिंदे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात 46 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आदरांजली वाहिली. सार्वजनिक रक्ताता राजाभाऊ कोठारी संयोजित कर्जत-खालापूर तालुक्यातील हे 453 वे शिबीर होते.

मोठे वेणगावमधील विठ्ठल मंदिराच्या सामाजिक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच भाई गायकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष रंजन दातार, सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, मंडळाचे अध्यक्ष जितेश आम्रे, उपाध्यक्ष वैभव सावंत, कैलास शिंदे, सचिव हरीश जाधव आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे पत्रकार विजय मांडे यांनी वयाच्या 65 व्या वर्षांच्या पदार्पणात आपले 69 वेळचे रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. रक्तसंकलनाचे काम समर्पण रक्तपेढी घटकोपरच्या डॉ. अभिषिका वाघचौरे, माधुरी सावंत, दीपेश सरदार, शिल्पा वाघमारे, सागर कांबळे, सान्वी किल्लेकर, अखिलेश भारती, सूरज किल्लेकर आदींनी केले. सूत्रसंचालन समीर शिंदे यांनी केले.
याप्रसंगी धनंजय दुर्गे, समीर चव्हाण, कैलास घारे, सुनील आंग्रे, राहुल देशमुख, राघवेंद्र केलटकर, भारत सावंत, जयवंत केलटकर, रुपेश चव्हाण, पराग आंबवणे, प्रशांत आंग्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version