उद्या आकाशात ब्लड मूनचा आविष्कार

। मुंबई । प्रतिनिधी ।
सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी म्हणजेच सोमवारी 8 नोव्हेंबरला या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. भारतात या चंद्रग्रहणाची सुरुवात संध्याकाळी 5:29 वाजता होईल आणि संध्याकाळी 6:19 ला संपेल.

यावेळी चंद्रावर पृथ्वीची सावली पडणार असून तो लाल रंगाचा दिसणार आहे. यालाच इंग्रजीमध्ये ब्लड मून असेही म्हणतात. जवळपास तीन वर्षांनंतर हे सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि रशियामधील काही भाग, तसेच आशिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अटलांटिक महासागर, प्रशांत महासागराच्या काही भागात हे दिसणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.

Exit mobile version