वरळीतील हिट अँड रन प्रकरण; मिहीर शाहचा रक्त तपासणी अहवाल निगेटिव्ह

। मुंबई । प्रतिनिधी ।

वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता आणि मद्य प्राशन केल्याचे त्याने तोंडी मान्य केले होते. मात्र त्याच्या रक्ताचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याने मद्यप्राशन केले नव्हते, असं यात म्हटले आहे. 7 जुलै रोजी झालेल्या या भीषण अपघातात 45 वर्षीय कावेरी नाखवाचा मृत्यू झाला होता. अत्यंत निर्घृणपणे मिहीरने कावेरीला मृत्यूच्या दाढेत ओढले आहे.

वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता आणि मद्य प्राशन केल्याचे त्याने तोंडी मान्य केले होते. मात्र मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली.

Exit mobile version