। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागच्या जे.एस.एम. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटमधील उत्कृष्ट कार्यामुळे मिहीर महेंद्र म्हात्रे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने ‘राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. मिहीर हे आगरसुरे गावाचे रहिवासी असून, त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे.
मिहीर म्हात्रे यांनी युनिटच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांची समाजसेवेतली निष्ठा, कामातील समर्पण आणि तरुणाईला प्रेरणा देण्याची क्षमता पाहता, त्यांना या सन्मानाचा हकदार ठरविण्यात आले. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेतली आहे.