उरणमध्ये बहरले वालाचे पिक

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण पूर्व विभागात सध्या वालाचा हंगाम सुरू झाला आहे. वाल, चवळीच्या पिकासाठी तसेच आंबा उत्पादनासाठी थंडीचा हंगाम उपयुक्त आहे. थंडीत पडणार्‍या दवावर हे पिक तयार होण्यास मदत होते. त्यामुळे यावर्षी थंडी उत्तम प्रकारे असल्याने यंदा हे पिक जास्त मिळणार असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
उरण पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, पाणदिवे गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या शेतात रब्बी हंगामात वाल, चवळी, मूग हे कडधान्याचे पिकाची लागवड करतात. हे पिक वाढत्या थंडीमुळे बहरते, यावर्षी थंडी उत्तम प्रकारे असल्याने यंदा वालाचे चवळीचे आणि मूगाचे मोठ्या प्रमाणात येणार अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच वाढत्या थंडीमुळे आंबा झाडाला मोहोर मुबलक प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा वाढत्या थंडीचा निश्‍चित वाल, चवळी मूग पिका बरोबर आंबा उत्पादनाला फायदा होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.

Exit mobile version