। पाटणा । वृत्तसंस्था ।
शेतकर्यांनी घेऊन जाणारी बोट गंडक नदीत बुडाल्याने 24 शेतकरी बुडाल्याची दुर्दैवी घटना बिहारमधील गोपालगंज येथे घडली आहे. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बोटीमधील एका इसमाने दुर्घटनेनंतर नदीतून पोहत आपले प्राण वाचवले आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव इंद्रजीत सिंग असून तो खेम मटिहानी गावचा होता आणि दुसरा मृतक जादोपूरच्या बारईपट्टी गावचा रहिवासी होता. बुडालेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.