| कोर्लई | वार्ताहर |
शासनाने जून ते जुलै असे दोन महिने मासेमारी करण्यास बंदी घातली होती. 1 ऑगस्टपासून मासेमारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुरुड एकदरा समुद्र किनाऱ्यावर कोळी बांधवांची लगबग दिसून येत आहे.
गेली दोन महिने मासेमारी करण्यास बंदी असल्याने आता पुन्हा मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने जय्यत तयारीला लागला आहे. कोळी बांधव आपापल्या बोटींची डागडुजी, रंगरंगोटी करून खोल समुद्रात जाण्याआधी बोटीमध्ये अन्नधान्य, बर्फ, पाणी, लागणारे इंधन, मासेमारीसाठी लागणारी जाळी व इतर साहित्य भरून जय्यत तयारी करीत असल्याचे चित्र समुद्रकिनाऱ्यावर दिसून येत आहे.







