बम्बईपाडा परिसरात आढळला मृतदेह

पनवेल । वार्ताहर ।

तालुक्यातील बम्बईपाडा परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचा रंग गोरा, अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे पांढरे असून, अंगात चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.विष्णू गावडे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version