। पेण । वार्ताहर ।
पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरणखोप ग्रामपंचायतीच्या र्काक्षेत्रामध्ये भुंडा पुलानजिक गवतात अनोळखी पुरूष जातीचा मृतदेह आढळला आहे. ही जागा घरत नामक व्यक्तीची असून या जागेवरिल गवत जेसीपीच्या सहाय्याने काढणचे काम सुरू असताना जेसीपी ऑपरेटरला गवतात मानवी मृतदेह असल्याचे आढळून आले. लगेचच निलेश ठाकूर आणि महेश पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात सदरील बाब कळवली. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरिक्षक देवेंद्र पोल, सहाय्क पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटील आदींसह पोलीस कर्मचारी व गुन्हा प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी येथे पोहोचले. पोलिसांनी सर्व घटनास्थळाची पाहणी करून सदरील मृत व्यक्ती ही 10 ते 15 दिवसापूर्वी मृत झालेली असावी असा अंदाज लावण्यात आला. याबाबत पेण पोलीस ठाणत अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.