थेरोंडा समुद्रकिनारी सापडला मृतदेह

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील थेरोंडा बाजारपाडा येथील समुद्रकिनारी गुरूवारी (दि.20) सायंकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची तपासणी केली असता, त्याच्या टी-शर्टवर काही चित्र दिसून आले. जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह एका मच्छीमाराचा असल्याचे समोर आले असून किशोर चोढणेकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मालवणमधील तोंडवली खाडीत मासेमारी करीत असताना 8 जून रोजी रात्रीच्या सुमारास होडी पलटी झाली होती. यामध्ये किशोर महादेव चोढणेकर समुद्रात बेपत्ता झाले होते. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. किशोर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Exit mobile version