। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील खांदा वसाहत परिसरात एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत. या मृत व्यक्तीचा चेहारा उभट, रंग सावळा, अंगाने सडपातळ, दाढी वाढलेली काळी पांढरी, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, सुमारे उंची 5 फुट, नाक सरळ, दाढी काळी-पांढरी बारीक, अंगात लाल पांढरा चेक्सचा फुल शर्ट, काळ्या रंगाची पँन्ट घातलेली आहे. या व्यक्तिबाबत कोणाला अधिक माहिती मिळाल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक बालाजी पवार यांच्याशी संपर्क साधावा.