। पनवेल । वार्ताहर ।
खारघर वसाहत परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खारघर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 55 ते 60 वर्षे असून उंची 5 फूट 7 इंच, डोक्यावरील केस व दाढी काळी-पांढरी, अंगाने हडकुळा आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास असल्यास खारघर पोलीस ठाणे किंवा पो.हवा.सखाराम चोरमले यांच्याशी संपर्क साधावा.