सहा दुचाकी जळून खाक
खोपोली | वार्ताहर |
खोपोलीतील चिन्मयनगर परिसरातील मालती हेरिटेज या इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकींना आग लागल्याची घटना मंगळवारी 14 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती मिळाली नसली तरी आगीत अनेक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.तर सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
संतोष गंदेकर रात्रीच्यावेळी कामावरून आल्यावर बजाज डिस्कवर दुचाकी बिल्डींगखाली उभी केली आणि सकाळच्यावेळेत अचानक दुचाकीला आग लागली शेजारी सुरेश पांडे (होंडी कंपनी),अखिला मुखिरीरा(महिंद्रा कं स्कुटी),सुरेंद्र दळवी (हिरो कंपनी),शिवाजी हिरडे(अँक्टीव्हा),इशा नायर(टीव्हीएस स्कुटर),तुषार मुद्रे(होंडा स्कुटर) आदिसह दोन सायकल आगीत जळून खाक झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अपघातग्रस्त टीमने घटनास्थळी धाव घेतली. खोपोली अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.या घटनेची खोपोली पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 435 प्रमाणे गुन्हा नोंद झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश कळसेकर तपास करीत आहेत.